Holi : १२४ मद्यपी चालकांवर मुंबई पोलिसांची कारवाई

होळी आणि रंगपंचमीला मोठ्या प्रमाणात काही वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वार मद्यप्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. अशा मद्यपी चालकासह वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांना दिले होते.
Holi :  १२४ मद्यपी चालकांवर मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई : होळी आणि रंगपंचमीनिमित्त मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत सोमवारी उशिरापर्यंत १२४ मद्यपींवर तर ४ हजार ५९३ विनाहेल्मेट आणि ४२८ ट्रिपल सीट वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.

होळी आणि रंगपंचमीला मोठ्या प्रमाणात काही वाहनचालक विशेषत: दुचाकीस्वार मद्यप्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. अशा मद्यपी चालकासह वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांना दिले होते.

सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी १२४ मद्यपी चालकाविरुद्ध कारवाई केली होती. यावेळी ४ हजार ५३९ चालक विनाहेल्मेट तर ४२८ चालक ट्रिपल सीट दुचाकी चालविताना दिसून आले. या सर्वांविरुद्ध वाहतूक पोलीस कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. दुसरीकडे होळी आणि रंगपंचमीनिमित्त शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in