प्रदूषणास कारणीभूत ठिकाणांची ऑन द स्पॉट झाडाझडती

मुंबईत वाढलेल्या प्रदूषणासाठी प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी २३ ऑक्टोबर रोजी नियमावली जाहीर केली
प्रदूषणास कारणीभूत ठिकाणांची ऑन द स्पॉट झाडाझडती

मुंबई : बांधकाम ठिकाणी हवेत पसरणाऱ्या धुळीच्या कणांमुळे प्रदूषणात वाढ होत असली तरी गल्लीबोळात असलेली हॉटेल, बेकरी यावर बसवण्यात आलेल्या चिमणी, शेकोटी पेटवल्याने त्या त्या भागात प्रदूषणात वाढ होत असल्याची नोंद सफर संस्थेकडून होते; मात्र सफर संस्थेने बसवलेल्या एअर माॅनेटेरिंग सिस्टम मध्ये बिघाड झाला किंवा चुकीची नोंद होते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेची टीम सफरने ठिकठिकाणी बसवलेल्या प्रदूषणमापन यंत्राची तपासणी करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत वाढलेल्या प्रदूषणासाठी प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी २३ ऑक्टोबर रोजी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत २७ प्रकारच्या नियमांमध्ये सर्वाधिक निर्देश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत. पालिकेने ३ नोव्हेंबरपासून स्कॉडच्या माध्यमातून सर्व वॉर्डमध्ये पालिकेने तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत.

प्रदूषण मापन यंत्राची तपासणी अन् जागा बदल

दरम्यान, प्रदूषण माजक यंत्रणांच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेचा दर्जा मोजला जात आहे; मात्र ही बसवलेल्या ठिकाणी होणाऱ्या कामांमुळेच हे प्रदूषण वाढत असल्याचे समोर आल्यामुळे ही यंत्रे बसवण्याची जागा बदलण्यात येणार असून, सर्वसमावेश नोंद होईल, अशा ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in