मालाड येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू ; २४ तासांत २६ ठिकाणी झाड व फांद्या कोसळल्या

दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबई शहर व दोन्ही उपनगरात एकूण २६ ठिकाणी झाड व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या
मालाड येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू ; २४ तासांत २६ ठिकाणी झाड व फांद्या कोसळल्या

मुंबईत पावसाचे आगमन झाल्यापासून पडझडीचे सत्र सुरु असून बुधवारी सकाळी ७.२६ वाजता मालाड पश्चिम मामलेदार वाडी येथे पादचाऱ्याच्या अंगावर झाड कोसळले. या दुर्घटनेत कौशल दोशी ( ३८) यांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबई शहर व दोन्ही उपनगरात एकूण २६ ठिकाणी झाड व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

मालाड पश्चिम मामलेदार वाडी जंक्शन येथून जाणाऱ्या कौशल दोशी यांच्या अंगावर झाड कोसळले. या दुर्घटनेत ते जखमी झाले असता कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डॉ. विनय यांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक पोलीस व मुंबई महापालिकेचे विभागीय अधिकारी पुढील तपास करीत आहेत.‌

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in