कफ परेड येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

सदर इसमाच्या नातेवाईकांनी पोलीस उपनिरीक्षक विकास कदम यांच्याशी संपर्क साधावा
कफ परेड येथे समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

मुंबई : १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता एक अनोळखी इसम (अंदाजे वर्ष ५०) हा बधवार पार्क लँडिंग पॉईंट येथे समुद्रात बुडत असताना येथील स्थानिक लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला समुद्रातून बाहेर काढल्यानंतर कफ परेड येथील मोबाईल वाहनाने या इसमाला जीटी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर इसमाची ओळख अद्याप पटली नसून त्याची उंची अंदाजे ५ फटू ६ इंच आहे. रंग सावळा आणि बांधा सडपातळ असून त्याने निळ्या रंगाची सफारी परिधान केली आहे. त्यामुळे सदर इसमाच्या नातेवाईकांनी पोलीस उपनिरीक्षक विकास कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कफ परेड पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in