Mumbai : भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी

भायखळा परिसरात मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली असून या घटनेत एकजण जखमी झाला आहे.
Mumbai : भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी
Mumbai : भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : भायखळा परिसरात मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली असून या घटनेत एकजण जखमी झाला आहे. समीर शेख असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ‘डी’ कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. समीर यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in