एसटी बस अपघातात एकाचा मृत्यू ;१९ जण जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला अपघाताचा काळा डाग लागला आहे
एसटी बस अपघातात एकाचा मृत्यू ;१९ जण जखमी

डोंबिवली : गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या बसला माणगाव येथे भरधाव वेगाने समोरून आलेल्या डम्परने धडक दिली. या धडकेत विनोद तारले (३८) या तरुणाचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडला. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राऊंडमधून हजारो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शेकडो एसटी बसेस कोकणाकडे रवाना झाल्या होत्या. डोंबिवलीहून राजापूरला निघालेली एसटी बस (एमएचओ-१४-बीटी-२६६५) ला रायगड जिल्ह्यात गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला अपघाताचा काळा डाग लागला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in