गोरेगाव येथील सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू

या घटनेचा स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करत आहेत
गोरेगाव येथील सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू

मुंबई : गोरेगाव पश्चिम गणेश रहिवासी सेवा मंडळ येथील एका घरात गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत हरिश चव्हाण (५५) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करत आहेत.

मुंबईत गोरेगाव पश्चिम येथे दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास श्री गणेश रहिवासी सेवा मंडळ येथील एका घरात गॅस सिलेंडरचा भडका झाल्याने आग लागली. या आगीत एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला तात्काळ जवळच्या एचबीटी टॅामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करण्यात आले. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्याआधीच काही वेळातच स्थानिक रहिवाशांकडून आग विजवण्यात आली. सदर घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in