वृद्धासह शिक्षिकेची ऑनलाईन फसवणूक

वयोवृद्धाला एक अॅप ओपन करण्यास प्रवृत्त करण्यात आले
वृद्धासह शिक्षिकेची ऑनलाईन फसवणूक

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत एका वयोवृद्धासह शिक्षिकेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे तेरा लाखांची फसवणूक केल्याची घटना अंधेरी आणि साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी साकिनाका आणि एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांचे दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे.

साकिनाका येथे राहणाऱ्या एका २९ वर्षांच्या शिक्षिकेला जॉबच्या नावाने एका ऑनलाईन टास्कची नोकरीची ऑफर देण्यात आली होती. दिलेले टास्क पूर्ण केल्यांनतर तिला जास्त कमिशनसह मोठे बक्षिस देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तिने विविध टास्कसाठी ५ लाख ५२ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला तिला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाले, मात्र नंतर तिला ठरल्याप्रमाणे कमिशन किंवा बक्षिस मिळाले नव्हते. त्यामुळे तिने साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला.

दुसर्‍या घटनेत एका ७८ वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने ७ लाख ३८ हजाराची फसवणूक केली. इलेक्ट्रीक बिल अपडेटच्या नावाने या वयोवृद्धाला एक अॅप ओपन करण्यास प्रवृत्त करण्यात आलेहोते.

logo
marathi.freepressjournal.in