विविध कारण सांगून तरुणीसह दोघांची ऑनलाइन फसवणूक

सुरुवातीला तिला एअर तिकिटावर चांगले रिफंड मिळाले होते. त्यामुळे तिने तिच्यावर विश्‍वास ठेवून जास्त कमिशनच्य मोहापायी सुमारे तीन लाख रुपये गुंतवून एअर तिकिट बुकींग केले होते.
विविध कारण सांगून तरुणीसह दोघांची ऑनलाइन फसवणूक
Published on

मुंबई : विविध कारण सांगून अज्ञात सायबर ठगाने एका तरुणीसह वयोवृद्ध प्राध्यापकाची सुमारे नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कांजूरमार्ग आणि बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन स्वंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. ३२ वर्षांची तक्रारदार तरुणी कांजूरमार्ग परिसरात राहत असून काही दिवसांपूर्वी तिला नर्मदा नावाच्या एका महिलेचा मॅसेज आला होता. तिने ती स्कॉय स्कॅनर कंपनीची प्रतिनिधी असून, ही कंपनीत ऑनलाइन एअर तिकिट बुकींग करते. तिला पार्टटाईम जॉबची ऑफर देत तिने तिला घरबसल्या ऑनलाइन तिकिट बुकींग केल्यास चांगले कमिशन आणि बोनस मिळेल, असे सांगितले होते. त्यानंतर तिने तिला एक लिंक पाठवून तिचे रजिस्ट्रेशन करून घेतले होते. घरबसल्या चांगला परतावा मिळत असल्याने तिनेही त्यास होकार दिला होता. सुरुवातीला तिला एअर तिकिटावर चांगले रिफंड मिळाले होते. त्यामुळे तिने तिच्यावर विश्‍वास ठेवून जास्त कमिशनच्य मोहापायी सुमारे तीन लाख रुपये गुंतवून एअर तिकिट बुकींग केले होते.

logo
marathi.freepressjournal.in