तरुणीचा मोबाईल चोरी करून ऑनलाईन फसवणूक

खात्यातून २ लाख ८० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते
तरुणीचा मोबाईल चोरी करून ऑनलाईन फसवणूक

मुंबई : कांदिवली येथे भाड्याने फ्लॅट पाहणसाठी आलेल्या एका तरुणीचा मोबईल चोरी करुन मोबाईलवरून पावणेतीन लाखांचे ऑनलाईन व्यवहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चारकोप पोलिसांनी जबरी चोरीसह अपहार, फसवणूक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार तरुणी ही मालाड येथे राहत असून, सध्या पॉलिसी बाजार कंपनीत हेल्थ इन्शुरन्स सल्लागार म्हणून कामाला आहे. तिला भाड्याने दुसऱ्या फ्लॅटची गरज होती, त्यामुळे तिने तिच्या परिचित लोकांना भाड्याच्या फ्लॅटविषयी सांगितले होते. २४ जूनला ती तिच्या एका मित्रासोबत मालाडच्या मालवणी, जनकल्याण नगर येथे एक फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. याच मोबाईलवरून युपीआयच्या माध्यमातून २४ जून ते २७ जून या कालावधीत या व्यक्तीने वेगवेगळे ऑनलाईन व्यवहार करून तिच्या खात्यातून २ लाख ८० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने मालवणी पोलिसांत तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in