नौदल अधिकाऱ्याची हॉटेल बुकिंगच्या वेळी ऑनलाईन फसवणूक

बँकेच्या कस्टमर केअरला फोन लावून कार्ड ब्लॉक केले.कुलाबा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नौदल अधिकाऱ्याची हॉटेल बुकिंगच्या वेळी ऑनलाईन फसवणूक

मुंबई : हॉटेल रूम बुक करताना नौदल अधिकाऱ्याची १.३२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

आयएनएस तेग येथे कम्युनिकेशन अधिकारी म्हणून अभिनव आनंद हे काम करतात. ते पुण्यात काही सरकारी कामानिमित्त जाणार होते. त्यासाठी त्यांनी हॉटेल बुक करण्याचे ठरवले.

तेथे त्यांनी www.lemontreehotels.org.in. या वेबसाइटवर जाऊन बुकिंग केले. तेथील नंबर घेऊन त्यांनी हॉटेलला फोन केला. ३ ते २५ जानेवारी दरम्यान बुकिंग करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांना हॉटेलचे भाडे आगाऊ भरायला सांगितले. त्यांचे डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्यांना ओटीपी आला. त्याची माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून १.३२ लाख रुपये गेले. तेव्हा तक्रारदाराने आरोपीकडे पैसे मागितले. तेव्हा आरोपीने पैसे चुकीने दुसरीकडे गेल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे आढळले. त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला फोन लावून कार्ड ब्लॉक केले.कुलाबा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in