पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस मुदतवाढ; २६ मेपर्यंत ऑनलाइन नावनोंदणी; २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे आता विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार आहे.
पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस मुदतवाढ; २६ मेपर्यंत ऑनलाइन नावनोंदणी; २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत वेळापत्रकाप्रमाणे आता विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार आहे. तर २७ मे पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व राज्य शासनाच्या २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स / ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी करायची आहे.

बिगर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असून आतापर्यंत २,२५,५५६ अर्ज नोंदणी झाली असून, १,४५,०८७ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांसाठी ५,०९,५७८ एवढे अर्ज सादर केले आहेत.

प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक

  • अर्ज विक्री (संबधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन) – २६ मे २०२५ (दुपारी १ वाजेपर्यंत)

  • प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर)-

  • २६ मे २०२५ (दुपारी १ वाजेपर्यंत)

  • ऑनलाईन एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख - २६ मे २०२५ (१ वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्यांक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

  • पहिली गुणवत्ता यादी - २७ मे २०२५ (संध्याकाळी ५ वाजता)

  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) - २८ मे ते ३० मे २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

  • द्वितीय गुणवत्ता यादी - ३१ मे २०२५ (संध्याकाळी ७ वाजता)

  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - २ जून ते ४ जून २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

  • तृतीय गुणवत्ता यादी - ५ जून २०२५ (संध्याकाळी ७ वाजता)

  • ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - ६ जून ते १० जून २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

  • कमेंसमेंट ऑफ क्लासेस/ ओरिएंटेशन - १३ जून २०२५.

logo
marathi.freepressjournal.in