म्हाडा लॉटरीत अत्यल्प गटासाठी केवळ ३५९ घरे, गोरगरीबांचे घराचे स्वप्न अपूर्णच

समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्याचा म्हाडा प्राधिकरणाचा मूळ उद्देश आहे.
म्हाडा लॉटरीत ताडदेवमध्ये साडेसात कोटींचे घर
म्हाडा लॉटरीत ताडदेवमध्ये साडेसात कोटींचे घर
Published on

मुंबई : समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्याचा म्हाडा प्राधिकरणाचा मूळ उद्देश आहे. मात्र म्हाडाचा घटक असलेले मुंबई मंडळ मूळ उद्देशापासून दूर जाऊ लागले आहे. मंडळाने जाहीर केलेल्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीमध्ये अत्यल्प गटातील नागरिकांसाठी केवळ ३५९ घरे उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे अत्यल्प गटात मोडणाऱ्या गोरगरीबांचे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. मुंबईत परवडणाऱ्या किमतीमध्ये हक्काचे घर मिळावे अशी आशा अनेक लोक बाळगून असतात. मात्र यंदाच्या लॉटरीने सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक घरे उपलब्ध करून दिलेली नाहीत. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. यंदाच्या लॉटरीत परवडणारी घरे नसल्याबद्दलही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

यंदाच्या लॉटरीत परवडणारी घरे नसल्याबद्दल अपेक्षाभंग झाला असल्याचे विजय कांबळे म्हणाले. या लॉटरीत ताडदेव येथील ७ कोटीच्या घराचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमतीही एक कोटींहून अधिक आहेत. महिना ६०-७० हजार रुपये पगार असणाऱ्या सामान्य माणसाला १ कोटी रुपये कर्ज कोणती बँक देईल, असा सवाल सचिन कदम यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in