फक्त ४४ दिवस पुरणार पाणी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत उरला केवळ 'इतका' पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील सध्याचा पाणीसाठा हा पुढील ४४ दिवस पुरेल इतका म्हणजेच १५ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १२.८९ इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. मुंबईला या सातही तलावांमधून दररोज ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे तलावांतील सध्याचा पाणीसाठा हा पुढील ४४ दिवस पुरेल इतका म्हणजेच १५ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबईत २६ मे रोजी मुसळधार पाऊस झाला. असे असले तरी या पावसाने तलावांकडे पाठ फिरवली आहे. २६ मे रोजी सात तलावांपैकी केवळ तुळशी तलावात सर्वाधिक १३२ मिमी, त्यापाठोपाठ विहार तलावात ९० मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र प्रमुख तलाव असलेल्या पाच तलावांपैकी फक्त मध्य वैतरणा तलावात २१ मिमी, त्यानंतर तानसा तलावात १२ मिमी, मोडक सागर तलावात ११ मिमी, भातसा तलावात ८ मिमी आणि सर्वात कमी अप्पर वैतरणा तलावात फक्त ७ मिमी इतका पाऊस पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

२ जून २०२५ रोजी सकाळपर्यंतचा शिल्लक पाणीसाठा :

logo
marathi.freepressjournal.in