रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त सेंट्रल पार्क! कुठलेही बांधकाम नाही; पालिकेकडून भूमिका स्पष्ट

दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी महालक्ष्मी येथील रेसकोर्सची कोट्यवधी रुपयांची जमीन आहे.
रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त सेंट्रल पार्क! कुठलेही बांधकाम नाही; पालिकेकडून भूमिका स्पष्ट
Published on

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून पालिकेच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे रेसकोर्सच्या जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्कच उभारण्यात येणार आहे. त्या १२० एकर जमीनीवर कुठलेही बांधकाम होणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाची आहे.

दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी महालक्ष्मी येथील रेसकोर्सची कोट्यवधी रुपयांची जमीन आहे. २११ जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या ताब्यात होती. मात्र या जमिनीवर सेंट्रल पार्क उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईकरांनी लावून धरली होती. अखेर २११ एकरपैकी १२० एकर जमीन पालिकेच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे या जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कोस्टल रोडची १७५ एकर जमीन आणि रेसकोर्सची १२० एकर जमीन एकूण ३०० एकर जमिनीवर लंडनच्या धर्तीवर मुंबई सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र सेंट्रल पार्क उभारताना कुठलेही बांधकाम याठिकाणी होणार नाही, अशी भूमिका पालिकेने स्पष्ट केली.

logo
marathi.freepressjournal.in