Mumbai : सलग दुसऱ्या दिवशी डॉक्टर संपावर; राज्यातील आरोग्य सेवेवर झाला परिणाम

राज्यातील तब्बल २२ सरकारी रुग्णालयांतील (Mumbai) ७ हजार डॉक्टर संपावर असून आरोग्य सेवेची तारांबळ उडाली आहे
Mumbai : सलग दुसऱ्या दिवशी डॉक्टर संपावर; राज्यातील आरोग्य सेवेवर झाला परिणाम
Published on

राज्यातील सरकारी रुग्णालये आणि महापालिकेतील निवासी डॉक्टरांनी बेमुदत पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. मार्ड संघटनेच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरु आहे. पण, यामुळे आरोग्यसेवा कोलमडली आहे. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन मागे घेण्याची मागणी केली होती. पंरतु, आद्यपही हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, मुंबईतील जे जे रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम, कूपर अशा मोठ्या रुग्णालयांतील डॉक्टर्स या संपात सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असून बाकी इतर सेवा मागण्या पूर्ण होईपर्यंत बंद ठेवणार असल्याचा मार्डने इशारा दिला आहे.

काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या?

बेमुदत संप पुकारलेल्या डॉक्टरांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. २०१८ पासूनचे थकीत वेतन सर्व कर्मचाऱ्यांना मिळावे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांची १,४३२ नवीन पदनिर्मिती करण्यात यावी. ० शासकीय महाविद्यालयांतील वसतिगृह, स्वच्छतागृहे यांच्यामध्ये सुधारणा आणावी. सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्यात यावे. तसेच, कोविड भत्ताही देण्यात यावा. महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनामध्ये अपघात विभाग, प्रसूती कक्ष, अतिदक्षता या विभागांमध्ये रुग्णसेवा सुरू ठेवली जाईल

logo
marathi.freepressjournal.in