ओपन स्पेस पॉलिसीबाबत १५ दिवसांत निर्णय; बैठकीनंतर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबईतील मैदाने व क्रीडांगण दत्तक धोरण मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. या धोरणाबाबत १०० हून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत
ओपन स्पेस पॉलिसीबाबत १५ दिवसांत निर्णय;  बैठकीनंतर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई : उद्यानांची देखभाल पालिकेने करावी तसेच क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल अशा विविध खेळासाठी मैदान दत्तक देण्यात यावे, अशी सूचना केल्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. तसेच मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्याआधी काही किरकोळ दुरुस्ती कामे तज्ज्ञ समितीने सूचवली आहेत. तरीही ओपन स्पेस व जलाशय पुनर्बांधणीचा अंतिम रिपोर्ट पुढील १५ दिवसांत येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही लोढा यांनी स्पष्ट केले. ओपन स्पेस पॉलिसीबाबत पुढील १५ दिवसांत निर्णय होईल, असे लोढा यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील मैदाने व क्रीडांगण दत्तक धोरण मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. या धोरणाबाबत १०० हून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. ओपन स्पेस पॉलिसीसंदर्भात मुंबईकरांची मते जाणून घेण्यासाठी पालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिनाभरापूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत ओपन स्पेस पॉलिसीला कडाडून विरोध केला. मुंबईकर म्हणून माझाही ओपन स्पेस पॉलिसीला विरोध असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेकडे निधीची कमतरता नाही, त्यामुळे उद्यानांची देखभाल पालिकेने करावी. परंतु मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी संस्था, कार्पोरेट कंपन्या पुढे येत असतील तर देण्यास काहीच हरकत नाही. यासाठी पालिकेने दर निश्चित करावे, अधिकार आपल्याकडे ठेवावे, अशी सूचना केल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. तरीही ओपन स्पेस पॉलिसीबाबत पुढील १५ दिवसांत निर्णय होईल, असे लोढा यांनी स्पष्ट केले.

मलबार हिल जलाशय ब्रिटिशकालीन असून आजही मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीने ही मेजर दुरुस्ती करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. जलाशयाची सी वन टॅकची काही प्रमाणात दुरुस्ती सूचवली असून दुरुस्तीसाठी २० ते ३० झाडांची कापणी करावी लागणार आहे. तसेच तीन चार दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. परंतु जलाशयाची पुनर्बांधणी हँगिंग गार्डनला धक्का न लावता दुरुस्ती करणे शक्य असल्याचे समितीने सुचवले आहे. तरीही समितीचा अंतिम रिपोर्ट पुढील १५ दिवसांत आल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे लोढा यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी अशी समिती स्थापन केली असून समितीनेही दोन वेळा जलाशयाची पाहणी केली आहे.

३०० मैदाने दत्तक तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

मुंबई शहर व उपनगरात ३०० पेक्षा जास्त मैदाने, क्रीडांगणे असून ती दत्तक तत्त्वावर दिली जाणार आहेत. ही मैदाने बँका, शाळा, क्रीडा, गृहनिर्माण संस्था, सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि दुकानदार संघटना, खासगी संस्था, कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्या विकसित करण्यासाठी घेऊ शकतात, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in