पीएम स्वनिधी योजनेंतर्गत निधी देण्यास विरोधकांचा विरोध

उपेक्षितांना निधी देण्याची योजना पालिकेने आखली आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मदत केली जात आहे.
पीएम स्वनिधी योजनेंतर्गत निधी देण्यास विरोधकांचा विरोध

मुंबई : पीएम स्वनिधी योजनेच्या तसेच पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत महिला, अपंग आणि तृतीयपंथ लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात पालिका प्रशासनाने पुढे केला आहे. यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल ६० कोटींचा निधी राखून ठेवला आहे. मात्र पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पालिकेचा पैसा देण्यास विरोधी पक्षाने विरोध केला आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजनेतून फेरीवाले आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी १० हजार रुपये कर्ज देण्यात येते. लाभार्थ्यांनी पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर, त्यांना २० हजार आणि नंतर ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यास पात्र होतात. किमान एक लाख लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उपेक्षितांना निधी देण्याची योजना पालिकेने आखली आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मदत केली जात आहे. नागरी सुविधा पुरविणे, नागरिकांसाठी विकासाचे प्रकल्प राबविणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. मात्र मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in