वृत्तपत्र विक्रेत्यावर पालिकेतर्फे कारवाई न करण्याचे आदेश

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसोबत वृत्तपत्र विक्रेत्यांवर होणाऱ्या कारवाई बद्दल बैठक आयोजित करण्यात आली होती.
वृत्तपत्र विक्रेत्यावर पालिकेतर्फे कारवाई न करण्याचे आदेश
Published on

मुंबई : राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसोबत वृत्तपत्र विक्रेत्यांवर होणाऱ्या कारवाई बद्दल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्त एटूटी तसेच वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मुलन) ए टू टी या विभागांना वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करू नये, असे आदेश देऊन सूचनेचे पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ सभांजी शिंदे यांच्या पुढाकाराने त्यांचे पदाधिकारी पांडुरंग पाटील यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून राज्य संघटनेचे कार्यकारिणी सदस्य दत्ता घाडगे, दीपक गवळी व संजय सातार्डेकर तसेच मुंबईतील इतर संघटनेचे सदस्य मधू माळकर, विलास जुवळे, संजय सानप, वैभव म्हात्रे, दीपक चव्हाण, बबन बाईत व किशोर येवले आदी उपस्थित होते. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बैठक करून त्यांच्या आदेशाने बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनिल काटे, अनिल शेवाळे व विजय अडसूळ यांच्या सहीनिशी ७ फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्त एटूटी तसेच वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मुलन) ए टू टी या विभागांना वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करू नये, असे आदेश देऊन सूचनेचे पालन करावे, असे पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. यापुढे कोणत्याही वृत्तपत्र विक्रेत्यावर अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली जाणार नाही. मुंबई वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राज्य संघटना जोमाने काम करेल, असे राज्य संघटनेचे कार्यकारिणी सदस्य दत्ता घाडगे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in