अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी चौकशीचे आदेश

सदरच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व इतर आनुषंगिक पुरावे पोलीस तपास अधिकाऱ्यांना तत्काळ देण्यात यावे. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांचे शाळेतर्फे चांगल्या समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात यावे.
अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी चौकशीचे आदेश

प्रतिनिधी/मुंबई

सांताक्रुझ येथील एका शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना ३० मार्च रोजी उघड झाली आहे. सदरची घटना ही अत्यंत निंदनीय असून याची सखोल चौकशी होणे आवश्यक असून संबंधित आरोपीने या प्रकारचे कृत्य अन्य मुलींसोबत केले आहे का? याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रधान सचिव शिक्षण विभाग, शिक्षण निरीक्षक मुंबई महानगरपालिका, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना दिले आहेत.

सदरच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व इतर आनुषंगिक पुरावे पोलीस तपास अधिकाऱ्यांना तत्काळ देण्यात यावे. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांचे शाळेतर्फे चांगल्या समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात यावे. आरोपी शिपायाला तत्काळ निलंबित करून त्यावर गुन्हा नोंद करावा. यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. शाळेच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांचे चारित्र्य व सचोटी पोलीस यंत्रणेकडून तपासून घेण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in