पुरातत्त्व विषयासंबंधी प्रदर्शनाचे आयोजन

विद्यार्थ्यांमध्ये तसेच जनसामान्यांमध्ये पुरातत्त्व विषयाबाबत जागृती करण्यासाठी अशा दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जात आहे.
पुरातत्त्व विषयासंबंधी प्रदर्शनाचे आयोजन
PM

मुंबई : पुरातत्त्व विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून साठ्ये  महाविद्यालयामध्ये पुरातत्त्व विषयासंबंधी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५, १६ आणि १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६पर्यंत पाहता येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभाग, बहि:शाल प्रशिक्षण केंद्र आणि प्राचीन भारतीय संस्कृती आणि बौद्ध अभ्यास विभाग, साठे महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५, १६ आणि १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६पर्यंत विलेपार्ले, मुंबई येथील साठ्ये महाविद्यालयात पाहता येणार आहे. या प्रदर्शनात पुरातत्त्वीय वस्तू, प्राचीन नाणी, मातीची भांडी, मूर्ती, हत्यारे अशा वस्तू पाहावयास मिळणार आहेत. प्रदर्शनाबरोबरच प्राचीन खेळ ही खेळता येणार आहेत.

भारतीय पुरातत्त्व शास्त्राचे महर्षी प्रा. डॉ. हसमुखलाल सांकलिया यांचा जन्मदिन हा पुरातत्त्व दिन (१० डिसेंबर) साजरा करण्यात येतो. तसेच भारतीय नाणकशास्त्राचे विख्यात संशोधक डॉ. पीएल. गुप्ता यांचा जन्मदिन नाणकशास्त्र दिन (२४ डिसेंबर) म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून पुरातत्त्व विषयासंबंधी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये तसेच जनसामान्यांमध्ये पुरातत्त्व विषयाबाबत जागृती करण्यासाठी अशा दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in