कुर्ला पश्चिम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

कानातील श्रवणयंत्र गरजू वयस्कर व्यक्तींना अत्यल्प दरात देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
कुर्ला पश्चिम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान कुर्ला शाखेतर्फे समर्पण ब्लड बँक यांच्या विनंतीवरून सामाजिक भान राखत दिनांक २३ जुलै सकाळी १० ते ३ या वेळेमध्ये अनुसे व प्रतिष्ठान कार्यालय, तर त्यावर कुर्ला पश्चिम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे. त्याचबरोबर एनजीओप्लास्टी, बायपास, अपेंडिक्स, मुळव्याध, हर्निया, मोतीबिंदू, गुडघा बदलणे, कॅन्सर, मुतखडा, यांसारख्या अनेक शस्त्रक्रिया या शिबिरात मोफत केल्या जाणार आहेत. तसेच अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना शारीरिक अवयव मोफत देण्याचा प्रयोजन केले आहे. गरजू विकलांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर इत्यादी सारख्या आवश्यक गोष्टी मोफत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर कानातील श्रवणयंत्र गरजू वयस्कर व्यक्तींना अत्यल्प दरात देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील सर्व सोयींचा उपभोग घेण्यासाठी व कार्यक्रमाचा हेतू साध्य करण्यासाठी सर्व रुग्णांनी व समाजातील युवकांनी सदर रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी राखावी, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in