ग्लोबल बुद्धिबळ लीगच्या प्रचारासाठी फ्लॅश मॉबचे आयोजन

'दुबई चेस चेस अॅण्ड कल्चर क्लब'मध्ये 21 जून ते 2 जूलै दरम्यान या ग्लोबल लीगचे आयोजन करण्यात आले आहे
ग्लोबल बुद्धिबळ लीगच्या प्रचारासाठी फ्लॅश मॉबचे आयोजन

या वर्षी प्रथमच ग्लोबल बुद्धिबळ लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगच्या प्रचारासाठी मुंबईतील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर फ्लॅश मॉब करण्यात आले. यावेळी उपस्थित बुद्धिबळ प्रेमींसाठी एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'दुबई चेस चेस अॅण्ड कल्चर क्लब'मध्ये 21 जून ते 2 जूलै दरम्यान या ग्लोबल लीगचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईला देशातील आर्थीक राजधानी समजले जाते. यात मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या वांद्रे किल्ला (कॅस्टेला डी चेस अॅग्युआडा) या मुख्य ऐतिहासिक स्थळी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. अशा महत्वाच्या ठिकाणी या मॉबचे आयोजन केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या अनेक बुद्धिबळ चाहत्यांची उपस्थिती होती. तसेत चेसबेस इंडियाचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सागर शहा देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या मॉबमध्ये सहभागी असलेल्या लोकेश वाटूने मॉबच्या निमित्ताने वांद्रे किल्ला बुद्धिबळाने भारलेला दिसून आल्याचे म्हटले. तसेच मॉबच्या सादरीकरणात कमालीची उर्जा आणि वेग असल्याने बुद्धिबळ लीगविषयीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या लीगची आतुरतेने वाट पाहत असल्याचे त्याने सांगितले.

या मॉबमध्ये बुद्धिबळच्या चाहत्यांना करण्यासाठी अनेक गोष्टी होत्या. त्यात ग्लोबल लीग प्रमाणेच सुंयक्त संघ शैलीतील बुद्धिबळ स्पर्धेचा समावेश होता. तसेच पॉप क्वीझचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी विजेत्यांना पारितोषिके देखील देण्यात आली.

ग्लोबल चेस लीग मंडळाचे अध्यक्ष जगदीश मित्रा या उपक्रमाविषयी माहिती देताना म्हणाले की, ग्लोबल चेस लीग ही बुद्धिबळातील एक आगळी वेगळी स्पर्धा असेल ज्यामुळे बुद्धिबळ जगाच्या कान्या कोपऱ्यात पोहचेल. तसेच हा उपक्रमात सहभागी झालेल्या मुंबईकरांना पाहून आम्हाला आनंद झाल्याचे म्हणत आजचा कार्यक्रम हा मोठ्या लीगच्या सुरुवातीची झलक असल्याचे म्हटले. तसेच बुद्धिबळाला जगभरातील घराघरांत होहचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in