देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'याद किया दिलने' चे आयोजन

०१ ऑक्टोबर रोजी 'याद किया दिलने' या कार्यक्रमाचे सोगो कुटुंबाकडून आयोजन करण्यात आले आहे.
देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'याद किया दिलने' चे आयोजन

मुंबई : देव आनंद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने रविवार, ०१ ऑक्टोबर रोजी 'याद किया दिलने' या कार्यक्रमाचे सोगो कुटुंबाकडून आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या १०० गाण्यांची मेडली या कार्यक्रमात सादर करणार आहेत. प्रत्येक गाणे साधारण २ मिनिटे, याप्रमाणे १०० गाणी x २ मिनिटे: २०० मिनिटे अशा प्रकारे सलग २०० मिनिटांची ही मेडली जागतिक विक्रम ठरणार आहे. सदर कार्यक्रम संध्याकाळी ०५:०० ते रात्री ०८:३० या कालावधीत दादर माटुंगा कल्चरल सेंटर, जे के सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाशेजारी, रुपारेल कॉलेज जवळ, माटुंगा रोड (पश्चिम), मुंबई - ४०००१६ येथे सादर होणार आहे. हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्ण काळातील देव आनंद यांच्या सदाबहार गाण्यांच्या मेडलीचा हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त श्रोत्यांनी/ प्रेक्षकांनी या विक्रमी कार्यक्रमास यावे, अशी सोगो कुटुंबाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. या अनोख्या विक्रमाची दखल व नोंद ओ माय गॉड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही संस्था घेणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in