सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सद्गुरू ब्लड बँक कोपरखैरणे यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात पेण मधील ११९ रक्तदात्यांनी रक्तदान केले
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान पेणच्या वतीने महात्मा गांधी सार्वजानिक वाचनालय पेण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरू ब्लड बँक कोपरखैरणे यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात पेण मधील ११९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड मंगेश नेने यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. यावेळी गडकिल्ले संवर्धनासाठी सतत झटणारे आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष समीर म्हात्रे हे देखील उपस्थित होते. यावेळी समीर म्हात्रे यांनी बोलताना आम्ही गडकिल्ले संवर्धनासाठी झटतानाच अशा प्रकारे शिबिरे देखील घेत आहोत आणि त्याला जो उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे यापुढे देखील मी माझ्या मावळ्यांना सोबत घेऊन अशा प्रकारचे समाजोपयोगी शिबिरांचे आयोजन करणार आहे, त्यातही सर्वांनी सहभागी व्हा असे सांगितले. या शिबिरासाठी सहयाद्री प्रतिष्ठान पेण अध्यक्ष केतन म्हात्रे, माजी अध्यक्ष रोशन टेमघरे, प्रवीण पाटील, राजेश पवार, साईराज कदम, अच्युत पाटील, स्वप्निल पाटील, कुमार नाईक या मावळ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in