'पाकनिर्णय २०२४'च्या पारितोषिक वितरणाचे आयोजन

या पाककला स्पर्धेचे परीक्षक असलेले मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहे
'पाकनिर्णय २०२४'च्या पारितोषिक वितरणाचे आयोजन
Published on

मुंबई : जागतिक पातळीवरील सर्वाधिक खपाचे प्रकाशन 'कालनिर्णय'ने गतवर्षी आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले तर त्यांच्या कालनिर्णय सांस्कृतीक दिवाळी अंकाला ३० वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाकनिर्णय पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आणि संगीत मैफिलीचे आयोजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केले गेले आहे. हे आयोजन शुक्रवारी २७ ऑक्टोबर २०२४ रोजी दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर खुला प्रवेश दिला जाणार आहे.

'कालनिर्णय'तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या 'पाकनिर्णय २०२४ स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण, 'कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२४ ’चे प्रकाशन या सोहळ्यात होणार आहे. पारितोषिक वितरण प्रख्यात मराठी अभिनेत्री सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पद्मविभूषण अशा भोसले यांनी अजरामर केलेली गाणी तरुण गायक सादर करणार आहेत.या सांगीतिक मैफलीमध्ये शाल्मली सुखटणकर,राधिका नांदे , सोनाली कर्णिक, अभिषेक नलावडे हे गायक गाणार आहेत. कुणाल रेगे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. यावेळी सामाजिक, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पाककला स्पर्धेचे परीक्षक असलेले मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in