विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासह अन्य खेळाडूंनी केले जंगी सेलिब्रेशन

विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासह अन्य खेळाडूंनी केले जंगी सेलिब्रेशन

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर पाच गडी राखून विजय मिळविताच रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मैदानात न उतरता मिळालेल्या या यशामुळे बंगळुरू संघातील खेळाडूंनी जंगी सेलिब्रेशन केले. विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासह अन्य खेळाडूंनी अत्यानंदाने जंगी सेलिब्रेशन केले.

बंगळुरूचा प्लेऑफमधील प्रवेश हा मुंबईच्या कामगिरीवर अवलंबून होता. मुंबईचा विजय झाला तरच बंगळुरू संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार होता. दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला असता तर बंगळरूचे आव्हान संपुष्टात आले असते. याच कारणामुळे बंगळुरूचे खेळाडू मुबई इंडियन्स संघाला पाठिंबा देताना दिसले.

तसेच बंगळुरूचे सर्वच खेळाडू मुंबई विरुद्ध दिल्ली हा सामना एकत्र पाहत होते. या सामन्यात मुंबईने दिल्लीला पाच गडी राखून पराभूत केल्यानंतर बंगळुरूच्या संघाने जोरदार जल्लोष केला. बंगळुरूचे विराट कोहली, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासारखे आघाडीचे खेळाडू मुंबईच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसले. मुंबईच्या विजयामुळे बंगळुरू संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. त्यामुळे कोहली आणि ड्यू प्लेसिस यांनी मुंबईला धन्यवाद दिले. या सामन्यात दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली. या सामन्यात मुंबईचा फलंदाज टीम डेव्हिड याने ११ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in