पावसाळ्यात उद्भवणारऱ्या साथीच्या रोगांचे रुग्ण वाढले

पहिल्या ५ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने मुंबईत आजाराचा धोका वाढला आहे.
पावसाळ्यात उद्भवणारऱ्या साथीच्या रोगांचे रुग्ण वाढले
Published on

पावसाळा सुरु होण्याआधीच पावसाळ्यात उद्भवणारे साथीच्या रोगांनी मुंबई पाउल टाकले आहे. जून महिन्याच्या पहिल्या ५ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने मुंबईत आजाराचा धोका वाढला आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेसह मुंबईत मलेरिया - ५७, गॅस्ट्रो - ७८, कावीळचे १५ रुग्ण आढळल्याने पालिकेच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, वांद्रे पूर्व - पश्चिम व भायखळ्यात गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून वरळी, प्रभादेवी परिसरात मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत.

१ ते ५ जून पर्यंत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो हे साथीचे आजार बळावत आहेत. दरम्यान, चिकुनगुनिया व स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण अद्याप सापडलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in