
मुंबईत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. जून महिन्याच्या २६ दिवसांत मलेरिया, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले असून स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेसह पावसाळी आजारांचे टेंशन वाढले आहे. दरम्यान, रे रोड, मदनपुरा, भांडुप येथे डेग्यूंने चिंता वाढवली आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला असताना, आता पावसाळी आजारांचा धोका वाढला आहे. पावसाचे आगमन होण्याआधी साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. १ ते २६ जूनपर्यंत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनीया हे साथीचे आजार बळावत असून थंडीत पसरणाऱ्या स्वाईन फ्लूचाही धोका वाढला आहे.