मुंबईत ३१ हजारांहून अधिक बेकायदा नळ कनेक्शन; कुर्ला, दादर, माहीम, धारावी भागात पाण्याची चोरी

शहरवासीयांची रोजची तहान भागविण्यासाठी १२० किमी अंतरावरुन मुंबईत पिण्याचे पाणी दिले जाते. स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होत असताना ही मुंबईत बेकायदा नळ कनेक्शन घेत पाणी चोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०२५ पर्यंत ३१६८३ बेकायदा नळ कनेक्शन असल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
मुंबईत ३१ हजारांहून अधिक बेकायदा नळ कनेक्शन; कुर्ला, दादर, माहीम, धारावी भागात पाण्याची चोरी
मुंबईत ३१ हजारांहून अधिक बेकायदा नळ कनेक्शन; कुर्ला, दादर, माहीम, धारावी भागात पाण्याची चोरी प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : शहरवासीयांची रोजची तहान भागविण्यासाठी १२० किमी अंतरावरुन मुंबईत पिण्याचे पाणी दिले जाते. स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध होत असताना ही मुंबईत बेकायदा नळ कनेक्शन घेत पाणी चोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०२५ पर्यंत ३१६८३ बेकायदा नळ कनेक्शन असल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

बेकायदा नळ कनेक्शन द्वारे पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास येताच पालिकेच्या जल विभागाने ३० हजार ३०२ नळ कनेक्शन कट केले आहेत. नळ जोडणी अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर १,३८१ नळ कनेक्शन अधिकृत करण्यात आले आहेत. दरम्यान, दादर, माहिम, धारावी भागात पाणी चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे.

पाणी हा प्रत्येकाचा अधिकार असून मागेल त्याला पाणी द्या, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे उत्तुंग इमारती असो झोपडपट्टी सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जून २०२२ मध्ये सर्वांना पाणी हे धोरण अंमलात आणले. मात्र या धोरणाला बगल देत झोपडीधारक, दुकानदार, हॉटेल, कारखाने, गोदाम मालक अनधिकृतपणे नळजोडणी करून पाणीचोरी करत असल्याचे निदर्शनास आले.

जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ३१६८३ अनधिकृत नळ जोडण्या असल्याचे निदर्शनास आले. २०१७ मध्ये ३३०२ अनधिकृत नळजोडण्या करण्यात आल्या होत्या. २०२५ मध्ये ३३१६ अनधिकृत नळजोडण्यात आढळल्या आहेत. २०२४ च्या तुलनेत यात काहीशी वाढ आहे. २०२४ मध्ये ३१५० अनधिकृत नळजोडण्या करण्यात आल्या होत्या. दादर, माहिम, धारावी या ‘जी’ उत्तर वॉर्डमध्ये, एम पश्चिम वॉर्ड या चेंबूर भागात, एम पूर्व वॉर्ड असलेल्या मानखुर्द, अणुशक्ती नगर, एल वॉर्डमधील कुर्ला, साकिनाका, चांदिवली, एन वॉर्ड असलेल्या घाटकोपर, टी वॉर्ड असलेल्या मुलुंड, पी उत्तर या मालाड, एच पूर्व वॉर्ड असलेल्या वांद्रे, खार पूर्व, के पूर्व वॉर्ड असलेल्या अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व आदी भागात सर्वाधिक बेकायदा नळ कनेक्शन असल्याचे निदर्शनास आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in