उज्जैनच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट; BMC करणार ५०० कोटींचा खर्च

दादर येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिराचा उज्जैनच्या धर्तीवर कायापालट होणार आहे.
उज्जैनच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट; BMC करणार ५०० कोटींचा खर्च

मुंबई : दादर येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिराचा उज्जैनच्या धर्तीवर कायापालट होणार आहे. यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी अंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार व वास्तूशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धीविनायक मंदिराच्या पुनर्नियोजनाच्या प्रकल्पाची घोषणा नुकतीच एका कार्यक्रमात केली. सिद्धीविनायक मंदिराचा डीपीआर सुद्धा चांगला झाला पाहिजे. मंदिरही सुंदर दिसेल असे काम केले जाणार आहे. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आणि पुनर्नियोजनासाठी उज्जैन मंदिराच्या आर्किटेक्चरची नियुक्ती करण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल. यासाठी महापालिका ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढते आहे. त्यामुळे सध्या असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मंदिर परिसराचाही कायापालट करण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने हाती घेतला सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने काही वर्षांपूर्वी मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. दरम्यान महापालिकेच्या जी - उत्तर विभागाने या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. यासाठी त्याकरीता निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार, वास्तुशास्त्रज्ञ यांची यासाठी निवड केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in