बदलापूर-वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली ;चार तासांनंतर लोकल सेवा पूर्वपदावर

कर्जत बदलापूर आणि बदलापूर ते मुंबईच्या दिशेने येणारी लोकल सेवा ठप्प झाली होती
File Photo
File Photo
Published on

मुंबई : मध्य रेल्वेच्या बदलापूर-वांगणी दरम्यान रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने कर्जत-बदलापूर लोकल सेवा ठप्प झाली होती. तर कर्जत स्थानकातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल बदलापूरपर्यंत धावत होत्या. दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि लोकल सेवा पूर्वपदावर आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था मध्य रेल्वेची आहे. लोकलमध्ये बिघाड, सिग्नल यंत्रणेत बिघाड असा मध्य व हार्बर मार्गावरील लोकल प्रवास असतो. शनिवारी कुर्ला येथे मालगाडी बंद पडल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आणि प्रवाशांना तारेवरची कसरत करत इच्छीत स्थळी पोहोचावे लागले. तर बदलापूर-वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कर्जत बदलापूर आणि बदलापूर ते मुंबईच्या दिशेने येणारी लोकल सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती केल्यानंतर लोकल सेवा सुरु झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in