सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड 

या बिघाडात तात्काळ दुरुस्ती करण्याचे काम मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली
File Photo
File Photo

मध्य रेल्वेवर सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने अप मार्गावरील लोकलची वाहतूक दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विस्कळित झाली. परिणामी अप धीम्या लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या असून त्या वेळेच्या मागे धावत आहेत. तर मध्य रेल्वेवर झालेल्या या बिघाडात तात्काळ दुरुस्ती करण्याचे काम मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. दरम्यान, या बिघाडामुळे मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. परिणामी दसऱ्याच्या सुट्टीनंतर ऑफिसकडे निघालेल्या चाकरमान्यांना काहीशी पायपीट करावी लागली. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in