जेजे रुग्णालयात ऑक्सिजन गळती शस्त्रक्रिया, रुग्णसेवेत अडचण

४ मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तर ३ मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या
जेजे रुग्णालयात ऑक्सिजन गळती शस्त्रक्रिया, रुग्णसेवेत अडचण

मुंबई : राज्य शासनाच्या जेजे रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने ७ शस्त्रक्रियांपैकी ३ मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. सोमवारी शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना शस्त्रक्रियागृहात नेण्यात येत होते, मात्र त्यापूर्वी डॉक्टरांनी केलेल्या पाहणीत शस्त्रक्रियागृहात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ४ मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तर ३ मोठ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पीडब्लूडी विभागाकडून ही कामे केली जातात. मात्र अशा गोष्टींमुळे रुग्ण आणि विभागातील डॉक्टरांनादेखील अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे असे होत असेल तर याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असे काही नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

शल्यचिकित्सा विभागाच्या या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने रुग्णांची हेळसांड झाली, तर विभागाच्या डॉक्टरांची धांदल उडाली. त्यामुळे पुढील शस्त्रकियेच्या दिवशी डॉक्टरांवरदेखील ताण येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in