INS Mormugao : शत्रूंना धडकी भरवणारी आयएनएस मोरमुगाओ भारतीय नौदलात दाखल; काय आहेत वैशिष्ट्ये?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थतीत भारतीय बनावटीची असलेली आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही नौका भारतीय दलामध्ये दाखल
INS Mormugao : शत्रूंना धडकी भरवणारी आयएनएस मोरमुगाओ भारतीय नौदलात दाखल; काय आहेत वैशिष्ट्ये?
Published on

आयएनएस मोरमुगाओ (INS Mormugao) ही पी १५ बी प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. यातील अंदाजे ७५ टक्के भाग हा भारतीय बनावटीचा आहे. तसेच, हे एक स्टील्थ गायडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे त्याचे जलावरण करण्यात आले. यामुळे हिंदी महासागरामध्ये भारतीय नौदलाचा दरारा वाढणार आहे, तर यामुळे सागरी सीमांची सुरक्षा आणखीन मजबूत होणार आहे. २०११मध्ये मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये विशाखापट्टणम श्रेणीतील ४ युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर कोलकाता श्रेणीमधील आयएनएस मोरमुगाओ ही दुसरी नौका आहे.

ही आहेत आयएनएस मोरमुगाओची वैशिष्ट्ये

आयएनएस मोरमुगाओ ही युद्धनौका ब्रह्मोस आणि बराक-८ सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. ही नौका ४ गॅस टर्बाइनच्या मदतीने ३० नॉट्सपेक्षा जास्त गती प्राप्त करू शकते. तसेच, आयएनएस मोरमुगाओ अणु, जैविक आणि रासायनिक युद्धात सहभागी होण्यास सज्ज आहे. आयएनएस मोरमुगाओ ही भारतातील आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली युद्धनौका आहे. याचे रडार क्रॉस सेक्शन चांगल्या स्टिल्थ वैशिष्ट्यांमुळे कमी केले गेले.

logo
marathi.freepressjournal.in