'पद्मासन' एकल कलाकृतींचे अनोखे प्रदर्शन

२६ डिसेंबरपासून सुरु झालेले हे प्रदर्शन १ जानेवारी २०२३ पर्यंत रसिकांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य
'पद्मासन' एकल कलाकृतींचे अनोखे प्रदर्शन

चित्रकार अल्पा पालखीवाला यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. २६ डिसेंबरपासून सुरु झालेले हे प्रदर्शन १ जानेवारी २०२३ पर्यंत रसिकांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे.

प्रस्तुत चित्रप्रदर्शनात रेखाटलेली विविधलक्षी चित्रे मुख्यतः पद्मासन, ध्यानधारणा, त्यापासून मानवी मनास लाभणारी मनःशांति, सुखद अनुभूति, स्वर्गीय आनंद व परमसुखाचा अनुभव वगैरेचे सर्वांना कलात्मक दर्शन घडवितात. एक्रिलिक रंगलेपन, चारकोल व इंक तसेच तत्सम माध्यमे यांचा अतिशय यथायोग्य व कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण समन्वय साधून रम्य व आशयघन प्रतिकात्मक तसेच बोलक्या चित्राचा आविष्कार आपल्या प्रस्तुत संपदेतून साकारला आहे. जैन धर्मातील अनेक धर्मग्रंथ, माहिती आणि वैशिट्यपूर्ण संकल्पनांचा त्याचप्रमाणे त्यांच्या रीतीरिवाजातील अनेक विलक्षण संस्कारांचा तिने फार अभ्यासपूर्ण विस्मयकारक आणि अद्भुतरम्य रीतीने स्वतःच्या कल्पनेनुसार समन्वय साधून कॅनव्हासवर काळा व करडा रंग आणि इतर तत्सम दर्जेदार रंगसंगतीतून प्रयोगशील व रचनात्मक शैलीत आविष्कार येथे रसिकांपुढे सादर केला आहे. सर्व धार्मिक संकल्पना, त्यातून प्रकट होणारी संभाव्य अनुभूती आणि आशयघन भावनोत्कटता ह्यांचा एक अनोखा व कलात्मक संगम व समन्वय साधून तिने येथे वैश्विक शांतिचे व तत्सम वैशिट्यपूर्ण रचनात्मक अनुभूतीचे कलात्मक व सौंदर्यपूर्णतेने नटलेले एक आगळेवेगळे सादरीकरण चित्रकाराने सर्वांपुढे सादर केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in