Palghar : ३२ कोटींचे कर्ज बुडवण्यासाठी कंपनीच्या एमडीच्या हत्येचा कट; संचालकासह सात जण अटकेत

शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीनंतर कंपनीचे ३२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवून कंपनीवर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मोहनसिंग परमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जीएसएम फॉईल्स लिमिटेडचे संचालक सागर गिरीश भानूशाली यांच्यासह सात जणांना वाळीव पोलिसांनी अटक केली आहे.
Palghar : ३२ कोटींचे कर्ज बुडवण्यासाठी कंपनीच्या एमडीच्या हत्येचा कट; संचालकासह सात जण अटकेत
Palghar : ३२ कोटींचे कर्ज बुडवण्यासाठी कंपनीच्या एमडीच्या हत्येचा कट; संचालकासह सात जण अटकेतप्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पालघर : शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीनंतर कंपनीचे ३२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवून कंपनीवर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मोहनसिंग परमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जीएसएम फॉईल्स लिमिटेडचे संचालक सागर गिरीश भानूशाली यांच्यासह सात जणांना वाळीव पोलिसांनी अटक केली आहे.

२४ जुलै रोजी वसई (पूर्व) येथील कंपनीच्या आवारात अज्ञात हल्लेखोराने परमार यांच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केले होते. तपासात भानुशालीने भाडोत्री शार्पशूटर्सच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले. शेअर बाजारातील तोट्यामुळे कर्जबाजारी झालेल्या भानुशालीने परमार यांच्याकडून शेअर्सच्या बदल्यात ३२ कोटी रुपये घेतल्यानंतर परतफेड टाळण्यासाठी हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशपर्यंत कारवाई करून आरोपींना अटक केली असून फॉरेन्सिक, डिजिटल व आर्थिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमी परमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कंपनीने सेबीला दिली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in