Palghar Bus Accident : शिवशाही बसची कठड्याला धडक; २४ प्रवासी सुखरूप

पालघर-सिन्नर महामार्गावरील वाघोबा खिंडीत रविवारी दुपारी शिवशाही बस कठड्याला धडकून अपघात झाला. बसच्या ब्रेक प्रणालीत बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. मात्र, बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील २४ प्रवासी सुखरूप असून कोणालाही दुखापत झाली नाही.
Palghar Bus Accident : शिवशाही बसची कठड्याला धडक; २४ प्रवासी सुखरूप
Palghar Bus Accident : शिवशाही बसची कठड्याला धडक; २४ प्रवासी सुखरूप
Published on: 

पालघर : पालघर-सिन्नर महामार्गावरील वाघोबा खिंडीत रविवारी दुपारी शिवशाही बस कठड्याला धडकून अपघात झाला. बसच्या ब्रेक प्रणालीत बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. मात्र, बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील २४ प्रवासी सुखरूप असून कोणालाही दुखापत झाली नाही.

रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पालघर एसटी आगारातून २४ प्रवाशांना घेऊन शिवशाही बस स्वारगेटच्या दिशेने रवाना झाली होती. दुपारी एकच्या सुमारास वाघोबा खिंडीतील पालघर नगर परिषदेच्या पाणीशुद्धीकरण प्रकल्पाजवळ बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस महामार्गालगतच्या कठड्याला जाऊन धडकली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. अपघाताची माहिती मिळताच एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था केली. त्यानंतर सर्व प्रवाशांना इच्छित स्थळी रवाना करण्यात आले.

तांत्रिक तपासणीचा प्रश्न ऐरणीवर

डोंगराळ आणि वळणांच्या महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसची नियमित तांत्रिक तपासणी आणि देखभाल किती महत्त्वाची आहे, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी अशा बिघाडांकडे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)