मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील औषध कंपनीत नायट्रोजन वायू गळती झाली. यामुळे कंपनीतील कामगारांना श्वास घेण्यास त्रास झाला. या दुर्घटनेत ४ कामगारांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
बोईसर येथील ‘मेडली फार्मा’ कंपनीत गुरुवारी दुपारी वायू गळती झाली. यामुळे सहा कामगार अत्यवस्थ झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चौघांना सायंकाळी ६ वाजता मृत घोषित केले गेले, तर दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती व कमलेश यादव आदींचा मृत्यू झाला तर रोहन शिंदे, निलेश हदल यांच्यावर उपचार सुरू आहेत.