पालघरमधील वारली हाट प्रकल्प रखडला; ५७ कोटींचा उपक्रम अद्याप अपूर्ण, स्थानिक कलाकार, आदिवासी समाजाचे भविष्य अंधारात

आदिवासी संस्कृती आणि वारसा आदिवासी चित्रकलेच्या संवर्धनासाठी उभारण्यात येत असलेला ५७ कोटींचा ‘वारली हाट प्रकल्प’ रखडल्याने स्थानिक कलाकार आणि आदिवासी समाजाचे भविष्य अंधारात आहे.
पालघरमधील वारली हाट प्रकल्प रखडला; ५७ कोटींचा उपक्रम अद्याप अपूर्ण, स्थानिक कलाकार, आदिवासी समाजाचे भविष्य अंधारात
पालघरमधील वारली हाट प्रकल्प रखडला; ५७ कोटींचा उपक्रम अद्याप अपूर्ण, स्थानिक कलाकार, आदिवासी समाजाचे भविष्य अंधारात
Published on: 

नितीन बोंबाडे

पालघर : आदिवासी संस्कृती आणि वारसाआदिवासी चित्रकलेच्या संवर्धनासाठी उभारण्यात येत असलेला ५७ कोटींचा ‘वारली हाट प्रकल्प’ रखडल्याने स्थानिक कलाकार आणि आदिवासी समाजाचे भविष्य अंधारात आहे. तब्बल ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाची प्रतीक्षा कायम आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून सुरु करावा अशी मागणी आदिवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत नांदगाव येथे २०१९ साली सुरू झालेल्या या प्रकल्पाला कोरोनामुळे मुदतवाढ देण्यात आली होती. डिसेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, २०२६ साल संपत आले तरी प्रकल्प अद्याप अपूर्णच आहे.

कलाकार, आदिवासींची प्रतीक्षा संपणार कधी?

स्थानिक आदिवासी कलाकारांना रोजगार आणि त्यांच्या कलाकृतींसाठी बाजारपेठ मिळावी, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश होता. मात्र, सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे कलाकारांचा अपेक्षाभंग होत आहे. सरकार आणि प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी आता होत आहे.

प्रकल्पाची महत्त्वाची कामे झाली ठप्प

या सांस्कृतिक केंद्रात ६६ व्यावसायिक गाळे, सात प्रदर्शन सभागृहे, एक कॉन्फरन्स हॉल, दोन कार्यशाळा, आठ डायनिंग हट, दोन एटीएम, ॲम्पी थिएटर, वाचनालय आणि निवास व्यवस्था उभारण्यात येणार आहे. मात्र, विद्युतीकरण, पथदिवे, सजावट आणि पाणीपुरवठा यासारखी महत्त्वाची कामे रखडल्याने प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in