भुलेश्वरमधील पंचधातूच्या मूर्तींना सर्वाधिक पसंती; अन्नपूर्णा, बालगोपाल मूर्तींना मोठी मागणी

मुंबादेवी मंदिराजवळच्या भुलेश्वर, गुलालवाडी बाजारपेठ पंचधातू व अष्टधातूंच्या मूर्तींसाठी खास ओळखली जात आहे. या बाजारपेठेत वेगवेगळ्या आकाराच्या पंच धातूच्या, अष्टधातूच्या मूर्ती भक्तांचे खास आकर्षण ठरत आहे. गणपती, लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, पंचमुखी हनुमान, खंडोबा, तिरुपती बालाची, श्री स्वामी समर्थ व अन्य देवदेवतांच्या मूर्ती उपलब्ध आहेत.
भुलेश्वरमधील पंचधातूच्या मूर्तींना सर्वाधिक पसंती; अन्नपूर्णा, बालगोपाल मूर्तींना मोठी मागणी
भुलेश्वरमधील पंचधातूच्या मूर्तींना सर्वाधिक पसंती; अन्नपूर्णा, बालगोपाल मूर्तींना मोठी मागणीगिरीश चित्रे
Published on

बाजारहाट

मुंबादेवी मंदिराजवळच्या भुलेश्वर, गुलालवाडी बाजारपेठ पंचधातू व अष्टधातूंच्या मूर्तींसाठी खास ओळखली जात आहे. या बाजारपेठेत वेगवेगळ्या आकाराच्या पंच धातूच्या, अष्टधातूच्या मूर्ती भक्तांचे खास आकर्षण ठरत आहे. गणपती, लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, पंचमुखी हनुमान, खंडोबा, तिरुपती बालाची, श्री स्वामी समर्थ व अन्य देवदेवतांच्या मूर्ती साधारण: २०० रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. अन्नपूर्णा व बालगोपाळाच्या मूर्तीला विशेष मागणी असल्याचे वंदना स्टीलचे व्यवस्थापक राजेश माडीन यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले.

पंचधातूच्या मूर्तींना पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनचा साज चढविण्यात आल्याने त्या अधिक सुंदर दिसतात. तसेच, त्यांच्याकडे पाहिल्यास एक वेगळीच अनुभूती भक्तांना येते. देवदेवतांसोबतच थोर महापुरुषांच्या पंचधातूच्या मूर्तीही या बाजारात पाहायला मिळतात. भुलेश्वर परिसरात पंचधातूच्या मूर्तींची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. या ठिकाणी राज्यासह देशविदेशातील भाविक पंचधातूच्या मूर्ती खरेदीसाठी येथे येत असल्याची माहिती राजेश पूजा भंडारच्या दुकानदारांनी दिली.

स्वामींची मूर्ती १५० रुपये ते १० हजारांपर्यंत

श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थांची अगदी दीड ते दोन इंचाची मूर्ती बाजारात उपलब्ध असून १५० रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत मूर्तीची किंमत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुखासाठी गाय-वासराची पूजा

आईच्या मायेप्रमाणे गायीची माया असते. त्यामुळे गायीचे पूजन केले जाते, असे बोलले जाते. गायीची पंचधातूची मूर्ती उपलब्ध असून १ इंच ते १५ इंचापर्यंत गाय-वासरूची मूर्ती १०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

पंचधातू म्हणजे काय?

पंचधातू म्हणजे पाच धातूंचे मिश्रण. त्यात सोने, तांबे, चांदी, जस्त आणि लोखंड यांचा समावेश आहे.

यूपीतून उपलब्ध होते मूर्ती

पंचधातूच्या मूर्तींची मागणी वाढली असून विविध धातूंच्या मूर्ती उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद व अलिगढ येथील कारखान्यातून मुंबईत आणल्या जातात.

प्रत्येक मूर्तीची वेगवेगळी किंमत

पंचधातूच्या मूर्ती या विविध आकारात उपलब्ध आहेत. अगदी अडीच इंचापासून ते चार पाच किलोपर्यंत पंचधातूच्या मूर्ती उपलब्ध आहेत.‌ त्यामुळे प्रत्येक पंचधातूच्या मूर्तीची किंमत वेगवेगळी असून २०० रुपयांपासून ते लाख, दीड लाखापर्यंत पंचधातूच्या मूर्ती उपलब्ध आहेत.‌

logo
marathi.freepressjournal.in