आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट आलेली आहे. सोमवारीही या परिसराला उष्णतेचा तडाखा बसणार आहे.
आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट आलेली आहे. सोमवारीही या परिसराला उष्णतेचा तडाखा बसणार आहे. सोमवारी मुंबईत तापमानाचा पारा ३९ अंशावर जाईल, तर पनवेल, कल्याण, अंबरनाथ, नेरळ येथे ४४ अंश तापमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी मुंबईत कमाल ३८.१ अंश तापमान नोंदवले गेले. सर्वसाधारण तापमानापेक्षा हे प्रमाण ४.४ अंशाने अधिक होते. तर हवेतील आर्द्रता ४० व ६१ टक्के नोंदवली गेली, असे सांताक्रूझ वेधशाळेने सांगितले. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे ३४.४ अंश तापमान नोंदवले गेले. ३० एप्रिल रोजी ३७ अंश, तर बुधवारी ३५ अंश तापमान असणार आहे. २ मे रोजी तापमान ३४ अंश असेल. मुंबईत ३७ अंशापेक्षा जास्त तापमान आढळल्यास उष्णतेची लाट जाहीर केली जाते. कारण सर्वसाधारण तापमानापेक्षा हे तापमान ४.५ अंशांनी जास्त आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना सुती कपडे परिधान करावेत, छत्री, टोपी घालावी. थेट सूर्यप्रकाशात येऊ नये. सतत पाणी पित राहावे, असे हवामान खात्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in