परभणीचा नासेरबिन अबुबकर दोषी ठरला

परभणीचा नासेरबिन अबुबकर दोषी ठरला
Published on

आयएसआयएस या जिहादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या परभणीच्या एका २९ वर्षाच्या तरुणाला एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. खटला सुरू होण्यापूर्वी आरोपी नासेरबिन अबुबकर याफईस याने गुन्ह्याची कबुली दिल्याने न्यायालयाने सुरूवातीलाच त्याला शिक्षा ठोठावली.

परभणीतील नासेरबिन याला २०१६मध्ये आयएसआयएस या जिहादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर नासेरबिनने आयएसआयएस या जिहादी संघटनेचा कमांडर फारुख याच्याकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तो इस्लामिक स्टेटच्या सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या जिहादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी ऑनलाईन संसाधने वापरत असल्याचे तपासात समोर आले होते. त्याच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. याची दखल घेत न्यायालयाने सात वर्षे कारावास आणि ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

logo
marathi.freepressjournal.in