१५ वर्षांनंतर उद्यानाचा मार्ग मोकळा ;घाटकोपर गरोडीया नगर येथील बेकायदा गॅरेज जमीनदोस्त

घाटकोपर गरोडीया नगर येथील आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे गॅरेज उभारण्यात आले होते.
१५ वर्षांनंतर उद्यानाचा मार्ग मोकळा ;घाटकोपर गरोडीया नगर येथील बेकायदा गॅरेज जमीनदोस्त

मुंबई : मुंबई महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. घाटकोपर येथील ९० फूट रोड वरील गरोडिया नगर येथील १५ वर्षापासून उभारण्यात आलेल्या अनधिकृत गॅरेजवर शुक्रवारी पालिकेने कारवाई केली. हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित होता. कारवाई करण्यात आल्याने हा भूखंड आता अतिक्रमणमुक्त झाला असून, उद्यान बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

घाटकोपर गरोडीया नगर येथील आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे गॅरेज उभारण्यात आले होते. हे गॅरेज हटवण्यासाठी पालिकेचा कायदेशीर लढा सुरू होता. अखेर १५ वर्षानंतर हे गॅरेज हटवण्यात आले आहे. "आम्ही गॅरेज मालकाविरुद्ध दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला आहे. हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित होता. गॅरेज हटवल्याने आता या भूखंडावर उद्यान तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया

हा भूखंड २०११ साली मनोरंजन मैदानासाठी होता; मात्र त्यावर गॅरेज मालकाने अतिक्रमण केले होते. मी त्यावेळी या भागाचा नगरसेवक होतो. आम्ही अतिक्रमण केलेले बांधकाम पाडले. त्यानंतर, प्लॉट बदलून त्याला गार्डन प्लॉट बनवण्यात आले. आम्ही प्लॉट भोवती कंपाऊंड वॉल देखील बांधली. पण गॅरेज मालकाने पुन्हा प्लॉटवर अतिक्रमण केले. यावर न्यायालयात सुर असलेली कायदेशीर लढाई पालिकेने जिंकली आहे.

- भालचंद्र शिरसाट, भाजपचे माजी नगरसेवक

logo
marathi.freepressjournal.in