अंधेरीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला

अंधेरी येथील गुंदवली मेट्रो रेल स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एका कारवर बांधकामाचा भाग गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळला.
अंधेरीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला
X
Published on

मुंबई : अंधेरी येथील गुंदवली मेट्रो रेल स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एका कारवर बांधकामाचा भाग गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अंधेरी पूल हा आधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित होता. त्यानंतर तो‘एमएमआरडीए’कडे देण्यात आला. अनेक वर्षे ‘एमएमआरडीए’ पुलाची देखभाल करत होते. त्यानंतर २०२२ साली ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारितील सर्व पुलांची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात आली. तेव्हापासून सर्व पुलांची देखभाल पालिका करत आहे. या पुलाच्या खालील भागात एका खासगी कंपनीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला.

याबाबत पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in