मोये मोये! मोबाईलचं व्यसन की स्टंटबाजी? लोकलमधील प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल

पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये दरवाजात लटकून जीवघेणा जुगाड
मोये मोये! मोबाईलचं व्यसन की स्टंटबाजी? लोकलमधील प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल
Published on

जगात अनेक प्रकारचे व्यसन आहेत, परंतु आजकाल ज्या प्रकारे जग झपाट्याने डिजिटल होत आहे, त्यात एक व्यसन असे आहे की जवळजवळ प्रत्येक व्यक्ती व्यसनाधीन आहे. आपण फोन किंवा मोबाईलच्या व्यसनाबद्दल बोलत आहोत. धोकादायक परिस्थितीतही लोक मोबाईल फोन वापरण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मुंबईच्या लोकल प्रवासामधील अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये दरवाजात लटकून प्रवास करणारा एक व्यक्ती इयरफोन्सवर गाणी एकण्यासाठी स्वतःचा मोबाईल चक्क दरवाजाच्या बाजूला असलेल्या पॅनलला अडकून प्रवास करताना दिसला. त्याचा हा जीवघेणा प्रयत्न बाजूच्या फलाटावर उभ्या असलेल्या एका प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याचे लक्षात येताच तो निर्लज्जपणे कॅमेऱ्याकडे हात हलवून पोज देखील देतो. 'मोये मोये' या सध्या ट्रेंडिंगमधील गाण्यासह ऑनलाइन अपलोड केलेला हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. गाणी ऐकण्यासाठीचा 'जीवघेणा जुगाड' बघून अनेकजण टीका करीत आहेत. ही टेक्नॉलॉजी देशाबाहेर जायला नको, अशा प्रतिक्रियांद्वारे नेटकरी या स्टंटबाजीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in