यूटीएस अॅपला प्रवाशांची पसंती २.०७ कोटी प्रवाशांनी केला यूटीएस अॅपचा वापर

प्रवाशांच्या सोयीसाठी ॲॅपमध्ये बदल केले असून चुकीच्या पासवर्डमुळे ॲॅप लॉक होण्याची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आणली आहे.
यूटीएस अॅपला प्रवाशांची पसंती २.०७ कोटी प्रवाशांनी केला यूटीएस अॅपचा वापर

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने यूटीएस अॅप उपलब्ध केले. २.०७ कोटी प्रवाशांनी यूटीएस अॅपचा वापर केला असून ऑक्टोबरमध्ये मुंबई विभागातील २.०२ कोटी प्रवाशांनी या ॲॅपचा वापर केला आहे. या ॲॅपच्या कार्यासाठी यूटीएस मोबाइल ॲॅपमध्ये बदल लागू करण्यात आले असून मध्य रेल्वेमध्ये ५ विभागात २.०७ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाइल ॲॅपचा वापर केला आणि २२.१८ कोटीची कमाई केली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी ॲॅपमध्ये बदल केले असून चुकीच्या पासवर्डमुळे ॲॅप लॉक होण्याची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आणली आहे. यूटीएस ॲॅप आणि पेमेंट ॲॅपदरम्यान टॉगल न करता थेट यूपीआय मोडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय प्रदान करून पेमेंट प्रक्रिया सुलभ केली आहे. पूर्वी स्रोत स्थानकापासून यूटीएस तिकीट बुक करण्याची बाह्य मर्यादा उपनगरीय स्थानकांसाठी २ किमी आणि उपनगरी नसलेल्या स्थानकासाठी ५ किमी होती. आता ते अनुक्रमे ५ किमी आणि २० किमी करण्यात आली आहे.

मार्च २०२३ पासून यूटीएस ॲॅपमध्ये किमान ५० रुपयाच्या ऑनलाइन मोडद्वारे रिचार्जचे बदल करण्यात आले आहे. हँडसेट बदलण्याची विनंती करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. परिणामी रेल्वेवरील तक्रारी कमी झाल्या आहेत. वापरकर्ते त्यांच्याकडे वैध प्रवास व सीझन तिकीट असेल तरी आता हँडसेट बदलाच्या विनंतीवर प्रक्रिया करू शकतात, जरी वापरकर्त्याने जाणूनबुजून हँडसेट बदलण्याची निवड केली तर ॲॅपला तिकीट सिंक होण्यासाठी एक तास लागेल.

तथापि, हँडसेट बदल सक्तीने (म्हणजे हँडसेट बदलणे आणि जुन्या डिव्हाइसमध्ये हँडसेट बदलण्याची विनंती सुरू न करता नवीन डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न) केल्यास, नवीन हँडसेटमध्ये तिकीट कार्यान्वित होण्यासाठी ॲॅपला २४ तास लागतील. १९ जानेवारी पासून एका तिकिटावर जास्तीत प्रथम श्रेणी आणि वातानुकुलित ईएमयूसाठी जास्त ४ प्रवाशांचे बुकिंग यूटीएस ॲॅपवर केले जात आहे. विशेष म्हणजे ॲॅप आता हिंदी, इंग्रजीसह आणि मराठी भाषेतही उपलब्ध आहे.

logo
marathi.freepressjournal.in