फेरीवाल्यांपासून प्रवाशांची होणार सुटका ;कठोर कारवाईसाठी मध्य रेल्वेने कसली कंबर

बेकायदा फेरीवाले, तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मध्य रेल्वेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
फेरीवाल्यांपासून प्रवाशांची होणार सुटका  ;कठोर कारवाईसाठी मध्य रेल्वेने कसली कंबर

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत बेकायदा फेरीवाल्यांचे बस्तान, रेल्वे तिकीटांचा काळा बाजार, रेल्वे परिसरात संशयित व्यक्ती निदर्शनास आल्यास मध्य रेल्वेच्या ९००४४४२७३३ या व्हाट्सअॅपवर तात्काळ फोटो व लोकेशन पाठवा, वेळीच कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसह कर्मचारी व अधिकाऱ्यांना केले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. बेकायदा फेरीवाल्यांचा बोलबाला असून, रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदा फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारण्यात येतो; मात्र बेकायदा फेरीवाले, तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मध्य रेल्वेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. बेकायदा फेरीवाले तिकीटांचा काळा बाजार करणारे व रेल्वे परिसरात संशयित व्यक्ती निदर्शनास आल्यास ९००४४४२७३३ या व्हाट्सअॅपवर तात्काळ फोटो व लोकेशन पाठवा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in