प्रवाशांना व्हॉटसअँपवर मिळणार मेट्रो १ चे तिकीट, सुविधा प्रवाशांच्या सेवेत

मेट्रो १ मधून दिवसाला पाऊणे चार लाख प्रवासी प्रवास करतात. अंधेरी येथील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यापासून प्रवासीसंख्या २० हजाराने वाढली
प्रवाशांना व्हॉटसअँपवर मिळणार मेट्रो १ चे तिकीट, सुविधा प्रवाशांच्या सेवेत

मेट्रोचे तिकीट मिळवण्यासाठी  रांगेत उभेराहण्याची आवश्यकता लागणार नाही. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने तिकीट खिडकीवर न जाता, रांग न लावता व्हॉटसअँपवर तिकीट उपलब्ध करण्याची सुविधा प्रवाशांसाठी कार्यरत केली आहे. आज (गुरुवार २४ नोव्हेंबर) पासून एमएमओपीएलकडून या सेवेचा आरंभ करण्यात येणार आहे.

मेट्रो १ मधून दिवसाला पाऊणे चार लाख प्रवासी प्रवास करतात. अंधेरी येथील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यापासून प्रवासीसंख्या २० हजाराने वाढली आहे. लवकरच प्रवासीसंख्या चार लाखांचा पल्ला गाठेल असा विश्वास एमएमओपीएलने व्यक्त केला आहे. प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एमएमओपीएलने प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांचा मेट्रो प्रवास कसा सुकर करता येईल याचाही प्रयत्न होताना दिसतो. याचाच भाग म्हणून आता एमएमओपीएलने व्हॉटसअँपवर ई-तिकिट सेवा सुरु केली आहे. मधल्या काळात एमएमओपीएलने एप्रिलमध्ये ई-तिकीट सेवा सुरू केली. मात्र हे ई-तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर जावे लागत होते. मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवाशाला ई-तिकीट उपलब्ध होत होते. परंतु यामध्ये प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत होता. वेळही खूप जात असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खिडकीवर जावे लागू नये यासाठी एमएमओपीएलने आता व्हॉटसअँपवर ई-तिकीट उपलब्ध करून दिले आहे. तिकीट व्हॉटसअँपद्वारे क्युआर कोडच्या रूपात वितरित केले जाणार आहे. ९६७०००८८८९ या क्रमांकावरील व्हॉटसअँपवर ‘हाय’ असा मॅसेज पाठविल्यानंतर जी लिंक येईल त्यावरून संबंधित प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन पेमेंटद्वारे ई-तिकीट घेता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in