रुग्णांचा डेटा एका क्लिकवर: पालिका रुग्णालयात ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम’;अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती

स्वस्त, मोफत व योग्य उपचार पद्धती या विश्वासाने देशभरातील रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात धाव घेत असतात.
रुग्णांचा डेटा एका क्लिकवर: पालिका रुग्णालयात ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम’;अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती

मुंबई : पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णसेवेत सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयात व दवाखान्यात 'हेल्थ मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम' राबवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) अश्विनी भिडे यांनी सांगितले. शुक्रवारी पालिका मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर त्या बोलत होत्या.

स्वस्त, मोफत व योग्य उपचार पद्धती या विश्वासाने देशभरातील रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात धाव घेत असतात. महिन्याला ५० ते ६० रुग्ण पालिका रुग्णालयात तपासणी येतात आणि यापैकी काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. पालिकेच्या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार होत असून, प्रत्येक रुग्णाचा डेटा ठेवणे गरजेचे आहे. एखाद्या रुग्ण काही वर्षांनी पुन्हा उपचारासाठी आल्यानंतर त्यांच्यावर आधी कशाबद्दल उपचार सुरू होते. काय काय औषधोपचार दिले, कुठल्या डॉक्टरने उपचार केले, याची सगळी माहिती गोळा करण्यात येणार आहे. याचा फायदा रुग्ण व रुग्णालय प्रशासनाला होणार आहे. दरम्यान, झिरो प्रिस्क्रीप्शन पॉलिसी लागू करण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे खरेदीची आवश्यकताच उरणार नाही.

सुशोभीकरणाची १,२०० कामे पूर्ण!

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत मोकळ्या जागांची निर्मिती, रस्ते, पूल, उड्डाणपूल, वाहतूक बेट, समुद्रकिनारे, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सुशोभित सार्वजनिक भिंती आदींशी निगडित १,२०० कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत.

आपला दवाखाना ३० लाखांहून अधिक लाभार्थी!

मुंबईकरांना घराजवळ, सोयीच्या वेळेनुसार आणि सर्वसमावेशक व विनामूल्य अशी प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' तसेच पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर सेवेचा आतापर्यंत ३० लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in